कुडाळात उद्या भाजपाचा तालुका कार्यकर्ता मेळावा…

2

कुडाळ ता.१६: तालुक्यातील भाजपा कार्यकर्त्यांचा मेळावा उद्या दिनांक १७ डिसेंबर रोजी सकाळी १०:०० वाजता येथील शांतादुर्गा मंगल कार्यालय,पाऊशी येथे आयोजित करण्यात आला आहे.यावेळी खासदार नारायण राणे व जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार उपस्थित राहून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत.

आगामी काळामध्ये होऊ घातलेल्या जिल्हा परिषद निवडणूक व ग्रामपंचायत निवडणूक यासंदर्भात संघटना बांधणी मजबूत करण्यासाठी आढावा बैठक,सर्व पदाधिकारी व सदस्य नवीन सभासद नोंदणी,अध्यक्ष निवड याबाबत चर्चा करण्यासाठी हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
या मेळाव्याला दत्ता सामंत ,जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजित देसाई,माजी जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर,जिल्हा सरचिटणीस जयदेव कदम,प्रभाकर सावंत आदी उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.

6

4