मंगलोर एक्सप्रेसमध्ये महिला प्रवाशाचा मृत्यू…

147
2
Google search engine
Google search engine
Google search engine

कणकवली, ता.१६:  मुंबई ते गोवा असा प्रवास करणार्‍या पॅमला सलिनो डिसूझा (वय 63 रा. दहिसर पूर्व) या महिलेचे आज कणकवलीत मृत्यू झाला. प्रवासादरम्यान अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे त्यांचे उपचारादरम्यान निधन झाले. पॅमला डिसूझा ह्या आपल्या नातेवाइकांसह गोवा येथे विवाहसमारंभासाठी जात होत्या. पहाटे रत्नागिरी स्थानका दरम्यान त्यांना अस्वस्थ वाटू लागले. मंगलोर एक्स्प्रेस कणकवलीत आल्यानंतर त्यांना येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.

\