नवविवाहिता आत्महत्याप्रकरणी तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी…

1897
2
Google search engine
Google search engine

कुणकेरी येथील घटना;पती,दीर व सासऱ्याचा समावेश…

सावंतवाडी ता.१६: कुणकेरी-परबवाडी येथील सौ.मधुरा मिलिंद परब या नवविवाहितेचा शारीरिक तसेच मानसिक छळ करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी
पोलिसांच्या अटकेत असलेल्या पती,दीर व सासर्‍याला येथील जिल्हा न्यायालयात हजर केले असता तिघांनाही चार दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.ही घटना काल दुपारच्या सुमारास घडली होती.याप्रकरणी विवाहितेच्या नातेवाईकांनी दिलेल्या तक्रारीनुसार काल रात्री उशिरा पती मिलिंद शांताराम परब (४०) ,दीर मंगेश शांताराम परब (४३) सासरा शांताराम परब(७०) व सासू सुलभा शांताराम परब(६२) या चौघांवर सावंतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.तर यातील पती,दीर व सासरा यांना पोलिसांनी अटक केली होती.दरम्यान आज सायंकाळी उशिरा त्यांना जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले.
याबाबत तिच्या नातेवाईकांकडून देण्यात आलेल्या तक्रारीत म्हटल्याप्रमाणे,यातील संशयितांकडून मृत मधुराचा लग्न झाल्यापासून सलग चार वर्षे शारीरिक तसेच मानसिक छळ सुरु होता.याच कारणाने तिने रविवारी दुपारी गळफास घेत आत्महत्या केली.यानंतर विवाहितेचा नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात धाव घेत सासरच्या मंडळीवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली होती.याकरिता इन्सुलि ग्रामस्थ तसेच मुलीकडील सर्व नातेवाईक पोलीस ठाण्यात दाखल झाले होते.सावंतवाडी पोलिसांनी दुपारी पती मिलींद परब, दीर मंगेश परब, तर सासरा शांताराम या तिघांना अटक केली.गुन्हा दाखल झाल्यानंतर अखेरीस मृत विवाहितेचा मृतदेह तिच्या नातेवाईकांनी ताब्यात घेतला.तिच्यावर येथील उपरलकर सार्वजनिक स्मशान भूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.