“सिंधुदुर्ग श्री” स्पर्धेचा मानकरी ठरला सावंतवाडीचा शिवाजी जाधव…

2

 

वेंगुर्ले ता.१६:  वेंगुर्ले येथील २३ व्या ‘सिंधुदुर्ग श्री’ जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेत सावंतवाडीचा शिवाजी जाधव ‘सिंधुदुर्ग श्री २०१९’ चा मानकरी ठरला. त्याला या किताबासह रोख रुपये सात हजार व सिंधुदुर्ग श्री हनुमान चषक देऊन गौरविण्यात आले. दरम्यान कुपवडे चा गणेश सरवंजे मेन्स फिजिक गटात विजेता ठरला. त्यालाही रोख तीन हजार रुपये मानाचा पट्टा व चषक देऊन गौरविण्यात आले.
वेंगुर्ले येथील साई दरबार सभागृहात रविवारी रात्री उत्तरोत्तर रंगतदार ठरलेल्या या शरीर सौष्ठव स्पर्धेचा आनंद वेंगुर्ले वासियांनी घेतला. बेस्ट शिव हनुमान ट्रस्ट सांताक्रुज मुंबई, बेस्ट शिव हनुमान व्यायाम शाळा कांदळगाव-मालवण आयोजित वेंगुर्लेतील श्री.सातेरी व्यायाम शाळे च्या रौप्यमहोत्सवा निमित्त वेंगुर्ले येथे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे उद्घाटन इंडियन बॉडी बिल्डिंग फेडरेशनचे सचिव सुरेश कदम यांच्या हस्ते झाले. यावेळी व्यासपीठावर नंदकुमार राणे, वेंगुर्ले न. प. चे मुख्याधिकारी वैभव साबळे, उमेश कोदे, श्री. चव्हाण, सातेरी व्यायाम शाळेच्या संचालिका सौ.अबोली सोन्सुरकर, आंतरराष्ट्रीय खेळाडू किशोर सोन्सुरकर, माजी सभापती जयप्रकाश चमणकर, बबलू कुबल, ऍड. मनीष सातार्डेकर, प्रवीण पारकर आधी उपस्थित होते.
यावेळी सुरेश कदम यांनी बँकोक, थायलँड येथे संपन्न झालेल्या आशियाई पंच परीक्षेत अ श्रेणी मिळविलेल्या किशोर सोन्सुरकर यांना ‘एशियन रेफ्री कार्ड’ देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच राज्य पंच परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विक्रांत हळदणकर, वसंत शेट्टी, अमोल तांडेल, सुधीर हळदणकर, हेमंत नाईक, श्री. घोगळे, महेश परब यांना राज्य पंच प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. निवेदक बादल चौधरी यांच्या निवेदनाने या स्पर्धेत रंगत आली. दरम्यान पुढील वर्षी २०२० ची ‘सिंधुदुर्ग श्री’ ही स्पर्धा कणकवली येथे घेण्याचे जाहीर करण्यात आली.
स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे *५० ते ५५ किलो गट* १) प्रथमेश कातळकर (सावंतवाडी), २)अमित मेस्त्री (बांदा), ३)अजय पेडणेकर (कणकवली), ४)अक्षय बोडये (मालवण), ५)अक्षय देऊलकर (मालवण) *५५ ते ६० किलो गट* १)अक्षय पेडणेकर (बांदा), २)गणेश सातार्डेकर (मालवण), ३)सुरज साळगावकर (तळवडे), ४)गजमुख गावडे (शिरोडा) ५) संकेत जाधव (मालवण).
*६० ते ६५ किलो गट* १) महेशकुमार गावडे (तळवडा), २) गणेश सरवंजे (कणकवली), ३ प्रितेश कोलगावकर (सावंतवाडी), ४) दर्शन गडेकर (शिरोडा), ५) मेघश्याम धुरी (वेंगुर्ला).
*६५ ते ७० किलो गट* १) सहदेव नार्वेकर (वेंगुर्ला), २) सचिन तुयेकर (ओरोस), ३) सौरभ वारंग (सावंतवाडी), ४) विपुल घोगळे (कणकवली). *७० किलो गटा वरील खुला गट* शिवाजी जाधव (सावंतवाडी), अमित कदम (फोंडा), दीपक घाडीगावकर (कणकवली), कौस्तुभ नाईक (सावंतवाडी), गौरव घावस्कर (सावंतवाडी).
सिंधुदुर्ग श्री २०१९ चा अंतिम विजेता शिवाजी जाधव (सावंतवाडी) तसेच बेस्ट पोझर विजेता गणेश सरवंजे (कणकवली) व मोस्ट इम्प्रुव बॉडी बिल्डर महेशकुमार गावडे (तळवडे) ठरला.
*मेन्स फिजिक्स २०१९* गटात १) गणेश सरवदे (कुपवडे), २) प्रितेश कोरगावकर (सावंतवाडी), ३) अमोल मोदी (फोंडा), ४) पंकज शितोळे (सावंतवाडी), ५) रोहन परब (कुडाळ), ६) चंद्रकांत कुबल (वेंगुर्ले). या स्पर्धेत पंच म्हणून सुरेश कदम, आशिष सावंत व श्रयूर सावंत (मुंबई), अमोल तांडेल (वेंगुर्ला), वसंत शेट्टी(कुडाळ), मंगेश घोगळे (सावंतवाडी), विक्रांत हळदणकर (सावंतवाडी), सुधीर हळदणकर (सावंतवाडी), हेमंत नाईक(वेंगुर्ले) आदींनी काम पाहिले.

4