पत्रकार उदय पडेलकर यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर ‘फेलोशीप’ पुरस्काराने सन्मानित

2

वैभववाडी ता.१७

पत्रकार उदय पडेलकर यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फेलोशिप पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.३५ वे राष्ट्रीय दलित साहित्य संमेलन नुकतेच दिल्ली येथे पार पडले त्यावेळी त्यांना हा पुरस्कार संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.सोहनपाल सुमनाक्षर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी माजी मंत्री बबनराव घोलप व जेष्ठ साहित्यिक प्रा.रतनलाल सोनाग्रा यांच्यासह साहित्य क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
उदय पडेलकर जिल्ह्यातील पडेल येथील रहिवाशी असून नोकरी धंदयानिमित्त मुंबई येथे वास्तव्यास आहेत.यांचे वृत्तपत्र लेखन तसेच सामाजिक व काम कामगार क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन ३५ व्या राष्ट्रीय दलित साहित्य संमेलन यांच्यावतीने हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. याअगोदर त्यांना साप्ताहिक कोकण दीप यांच्यावतीने वृत्तलेखन व सामाजिक कार्यासाठी कोकण रत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. तसेच मुंबई महापालिकेने स्वच्छ भारत अभियानांतर्गत त्यांना त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल गौरव पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे .त्यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.

फोटो- डाॕ.सोहनपाल सुमनाक्षर यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारताना पञकार उदय पडेलकर.

3

4