मालवण पंचायत समिती सभापती पद अनिसुचित जातीसाठी आरक्षित…

325
2
Google search engine
Google search engine

अजिंक्य पाताडे यांना संधी; जिल्ह्यातील आठही सभापती सोडती निश्चित

ओरोस ता १७: 
जिल्ह्यातील आठही सभापती आरक्षक मंगळवारी काढण्यात आली. यावेळी मालवण सभापती अनुसूचित जातीसाठी आरक्षित झाले. येथे एकमेव अजिंक्य पाताडे या आरक्षणात निवडून आल्याने त्यांची सभापती पदी वर्णी निश्चित झाली आहे.
जुन्या डीपीडीसी सभागृहात जिल्हाधिकारी डॉ दिलीप पांढरपट्टे यांच्या उपस्थितीत ही आरक्षण काढण्यात आली. यावेळी उपजिल्हाधिकारी रोहिणी रजपूत उपस्थित होत्या. यावेळी वैभववाडी सभापती नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलासाठी आरक्षित झाले असून दोडामार्ग सभापती पद नागरिकांचा मागास प्रवर्ग खुला यासाठी राखीव झाले आहे. कुडाळ, वेंगुर्ले व सावंतवाडी सभापती पद सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षित झाले असून कणकवली व देवगड सर्वसाधारण प्रवर्ग राहिले आहे.