तुमच्यासह पुत्रांना जनतेने का नाकारले याचे आत्मचिंतन करा…

224
2
Google search engine
Google search engine

परूळेकर यांचा राणेंना टोला;रेल्वे टर्मिनस प्रश्नी भूमिका जाहीर करण्याची मागणी…

सावंतवाडी ता.१७: दीपक केसरकर यांच्यावर आरोप करणा-या नारायण राणे यांच्यासह पुत्रांना जिल्ह्यातील जनतेने वारंवार का नाकारले याचे आत्मचिंतन राणेंनी करावे,असा टोला शिवसेनेचे प्रवक्ते डाॅ.जयेंद्र परूळेकर यांनी आज येथे लगावला.केसरकरांना मते का घालता,असे सावंतवाडीकरांना विचारणे म्हणजे हा येथील लोकांचा अपमान करण्यासारखेचं आहे,असे सांगुन भाजपाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांनी रेल्वे टर्मिनल्स प्रश्नी आपली भूमिका जाहीर करावी,असेही त्यांनी सांगितले.
श्री.परूळेकर यांनी आज येथे पत्रकार परिषद घेतली.यावेळी वसंत केसरकर,रूपेश राऊळ,बाबू कुडतरकर,उमेश कोरगावकर,उमा वारंग,शब्बीर मणीयार आदी उपस्थित होते.