अटकेत असलेल्या पतीनेच दिला मधुराला “चिताग्नी”

2

सावंतवाडी पोलिसांची माहीती;कुणकेरीतील नवविवाहिता आत्महत्या प्रकरण

सावंतवाडी ता.१७: कुणकेरी येथील मधुरा मिलिंद परब हिचा मृतदेह माहेरच्या व्यक्तींनी ताब्यात घेण्यास नकार दिल्यामुळे अखेर पोलिसांनी सासरच्या लोकांच्या तो ताब्यात दिला.विशेष म्हणजे पोलिसांच्या मदतीने अटकेत असलेल्या पतीने आपल्या पत्नीला चिताग्नी दिला.काल सायंकाळी उशिरा येथील उपरलकर स्मशानभूमी तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.याबाबतची माहिती सावंतवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अण्णासो बाबर यांनी दिली.

मानसिक छळाच्या आरोपातून सौ.परब यांनी कुणकेरी येथील आपल्या राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली.दरम्यान तिच्या माहेरच्या लोकांनी हा मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला.त्यामुळे अटकेत असलेल्या मिलिंद परब याच्याकडुन पोलिसांच्या मदतीने पुढील सोपस्कार पार पाडले,अशी माहिती श्री.बाबर यांनी दिली आहे.

4