तुळस येथील युवक दारू वाहतूक करताना पोलिसांच्या जाळ्यात

2

दीड लाखाचा मुद्देमाल जप्त…

वेंगुर्ले.ता.१७:  वेंगुर्ले येथे गोवा बनावटीची दारू वाहतूक करताना तुळस येथील अष्टविनायक ज्ञानदेव सावंत (वय २८) याला वेंगुर्ला पोलिसांनी ताब्यात घेतले.त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तुळस ते वेंगुर्ला दरम्यान काल रात्री ११ वाजताच्या सुमारास तुळस घाटीत व्हॅगनार गाडी क्र.एम.एच.०२ बी.डी.११३६ या गाडीला गस्तीस असलेल्या पोलिसांनी थांबविले. गाडीची तपासणी केली असता चालक अष्टविनायक ज्ञानदेव सावंत रा. तुळस काजरमळी याच्या कडे गोवा बनावटीची नॅशनल ब्रॅन्डी नावाची दारू आढळून आली. सदर गाडीत दारूचे १५ बॉक्स सापडले असून गाडीसह १ लाख ५४ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांकडून जप्त करण्यात आला आहे. महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम ६५ (अ) (ई) या कायद्यानुसार वेंगुर्ला पोलिसांनी सदर कारवाई केली असून या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक श्री पाटील, पोलीसनाईक धुरी, चोडणकर, कांडर हे हे पोलीस होते.

1

4