Thursday, December 12, 2024
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्यागोव्यातील एलईडीधारक ट्रॉलरचा मासेमारी परवाना, नोंदणी प्रमाणपत्र रद्द करा...

गोव्यातील एलईडीधारक ट्रॉलरचा मासेमारी परवाना, नोंदणी प्रमाणपत्र रद्द करा…

वैभव नाईकांची मागणी ; मत्स्यव्यवसाय मंत्र्यांकडून मत्स्य आयुक्तांना कारवाईचे आदेश…

मालवण, ता. १७ : राज्याच्या सागरी हद्दीत अवैधरित्या एलईडी लाईटद्वारे मासेमारी करणारे परराज्यातील ट्रॉलर्स मत्स्यविभागाकडून जप्त केले जात आहेत. शासनाने १८ नोव्हेंबर २०१९ रोजी अवैधरीत्या एलईडी लाईटद्वारे मासेमारी करणाऱ्या नौकांचा मासेमारी परवाना, नोंदणी प्रमाणपत्र रद्द करण्याचा शासन निर्णय निर्गमित केला आहे. या शासनिर्णयानुसार मत्स्य विभागाने पकडलेल्या ट्रॉलर्सवरील मासेमारी परवाना, नोंदणी प्रमाणपत्र रद्द करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना द्यावेत अशी मागणी आमदार वैभव नाईक यांनी मत्स्यव्यवसाय मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे केली आहे. त्यानुसार श्री. थोरात यांनी मत्स्य आयुक्तांना कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
आमदार वैभव नाईक व शिवसेना आमदार यांनी शासनाकडे कित्येक वेळा बैठका व पाठपुरावा केल्यानंतर शासनाने १८ नोव्हेंबर २०१९ रोजी अवैधरीत्या एलईडी लाईटद्वारे मासेमारी करणाऱ्या नौकांना महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम १९८१ च्या कलम ६ अन्वये देण्यात आलेला मासेमारी परवाना कलम ८(१) ब नुसार रद्द करण्याबाबत कारवाई करण्यात यावी व कलम ९ अन्वये देण्यात आलेले नोंदणी प्रमाणपत्र कलम ९(४) नुसार निलंबित अथवा रद्द करण्याची कार्यवाही तत्काळ करण्यात यावी असा शासननिर्णय निर्गमित केला आहे. येथील समुद्र किनारपट्टीवर अशा प्रकारे अवैधरित्या एलईडीद्वारे मासेमारी करताना गोवा राज्यातील अल्बर्ट डिसोझा यांच्या मालकीचा सी एन्जल आयएनडी- जीए -०१-एमएम २७० हा एलईडी ट्रॉलर मस्त्य विभागाने कारवाई करून जप्त केला आहे. तरी एलईडी मासेमारीला आळा बसावा यासाठी शासन निर्णयानुसार या ट्रॉलरचा मासेमारी परवाना, नोंदणी प्रमाणपत्र रद्द करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना द्यावेत अशी मागणी आमदार नाईक यांनी केली. त्यांच्या मागणीनुसार कारवाई करण्याचे आदेश मत्स्यव्यवसाय मंत्री श्री. थोरात यांनी मत्स्य आयुक्तांना दिले आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments