बांदा व्यापारी संघाचे माजी अध्यक्ष विनोद शिरोडकर यांचे निधन…

2

बांदा ता.१७:
येथील बांदा व्यापारी संघाचे माजी अध्यक्ष विनोद सुर्यकांत शिरोडकर (वय ६३, रा. बांदा-काळसेवाडी) यांचे गोवा-बांबोळी येथील रुग्णालयात उपचारा दरम्यान दु:खद निधन झाले. त्यांना हृदयविकाराचा धक्का आल्याने त्यांच्यावर रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. त्यांनी आपल्या कार्यकाळात व्यापारी संघाच्या माध्यमातून व्यापाऱ्यांच्या समस्या सोडविल्या होत्या. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा मुलगी, भाऊ-बहीण असा परीवार आहे. सावंतवाडी येथील प्रतिष्ठीत व्यापारी अण्णा शिरोडकर यांचा पुतण्या तसेच सतिश शिरोडकर यांचे ते भाऊ होत. उद्या बुधवारी सकाळी बांदा येथे अंत्यसंस्कार होणार आहेत.

4