सावंतवाडी पंचायत समितीवर धुरी,की गोवेकर…?

2

सावंतवाडी ता.१८: येथील पंचायत समिती सभापती पदाचे आरक्षण महिला सर्वसाधारण असे पडले आहे,त्यामुळे आता याठिकाणी नेमकी कोणाला संधी मिळते,हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.सदयस्थितीत तरी या ठीकाणी सदस्या मानसी धुरी आणि मनीषा गोवेकर यांचे नाव आघाडीवर आहे.मात्र गोवेकर यांनी मध्यंतरीच्या काळात काँग्रेसची संधान बांधल्यामुळे त्यांचा नावाचा विचार होईल की नाही,हे प्रश्नचिन्ह आहे.
सद्यस्थिती पंचायत समिती नारायण राणे यांच्या ताब्यात आहे.याठिकाणी राणे यांनी आता काँग्रेसमधून भाजपामध्ये प्रवेश केल्यामुळे या ठिकाणी त्यांची ताकद वाढली आहे.त्यामुळे ही पंचायत समिती भाजपच्या ताब्यात राहणार आहे.त्यामुळे त्या ठिकाणी नेमकी कोणाला संधी मिळते,हे चित्र काही दिवसात स्पष्ट होणार आहे.तूर्तास तरी शिवसेनेकडे संख्याबळ नसल्यामुळे पदासाठी कोणाची निवड होते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

4