एस.एम.देशमुख;पुढील काळात प्रयत्न करणार…
मुंबई ता.१८: पत्रकार संरक्षण कायदा केंद्र सरकारने संमत करून तो देशभर लागू करावा,यासाठी पुढील काळात प्रयत्न करणार असल्याची घोषणा महाराष्ट्र पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे निमंत्रक एस.एम.देशमुख यांनी केली आहे.महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायदा नुकताच लागू झाला आहे.त्यासाठी एस.एम.देशमुख यांच्या नेतृत्वाखीलील सलग १२ वर्षे राज्यातील पत्रकारांनी लढा दिला आहे.अखेर हा लढा यशस्वी झाला आणि ७ डिसेंबर २०१९ पासून हा कायदा राज्यात लागू झाला.कायदा व्हावा यासाठी देशमुख आणि किरण नाईक यांनी अथक प्रयत्न केले.त्याबद्दल रायगड प़ेस क्लबच्यावतीने देशमुख आणि नाईक यांचा आज रसायनी येथे ज्येष्ट पत्रकार प़काश जोशी यांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला.त्यावेळी देशमुख बोलत होते.
आपल्या भाषणात देशमुख यांनी पत्रकार संरक्षण कायदा आणि पत्रकार पेन्शन योजनेसाठीचा लढा अंत पाहणारा होता.निराश करणाराही होता.मात्र राज्यातील पत्रकारांची एकजूट, मला दिलेली खंबीर साथ आणि माझ्यावर दाखविलेला विश्वास यामुळे जिद्दीने ही लढाई लढलो आणि त्यात आपण यशस्वी झालो असे मत व्यक्त केले.या लढयात रायगडमधील पत्रकारांचे योगदान मोठे होते.प्रत्येक आंदोलनात रायगडच्या पत्रकारांनी हिरीरीने सहभाग नोंदविला होता याची आठवण देशमुख यांनी यावेळी करून दिली.रायगड ही माझी कर्मभूमी आहे.माझ्या कर्मभूमीत होणारा माझा सत्कार माझ्यासाठी लाख मोलाचा असल्याच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या.पत्रकार पेन्शन आणि कायदयासाठीची लढाई कठीण होती.मात्र एस. एम.देशमुख यांचे खंबीर नेतृत्व आणि त्यांना आपण दिलेली साथ यामुळे हे दोन्ही निर्णय झाले आहेत.हे दोन्ही निण॓य ए्तिहासिक असल्याचे मत ज्येष्ठ पत्रकार प़काश जोशी त्यांनी व्यक्त केले.कायद्याची काटेकोर अंमलबजावणी व्हावी यासाठी आता काळजी घ्यावी लागेल याची जाणीव त्यांनी करून दिली.
यावेळी परिषदेचे विश्वस्त किरण नाईक, परिषदेचे माजी सरचिटणीस संतोष पवार, मिलिंद अष्टीवकर, नागेश कुलकर्णी आदिंची भाषणं झाली.रायगड प्रेस क्लबचे अध्यक्ष अनिल भोळे यांनी प्रास्ताविक केले.यावेळी शोभना देशमुख तसेच रायगड प़ेस क्लबच्या माजी अध्यक्षांचाही सत्कार करण्यात आला.कार्यक़मास जिल्हयातून पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.