नगराध्यक्ष लढतीचे चित्र आज स्पष्ट होणार …

117
2

सावंतवाडी पालिका निवडणूक;महा विकासआघाडी होणार,की नाही याकडे लक्ष…

सावंतवाडी/शुभम धुरी,ता.१८: येथील नगराध्यक्ष पदाच्या शर्यतीत नेमके कोण उमेदवार राहणार,महाविकास आघाडी होणार की नाही,काँग्रेससह भाजपचा उमेदवार बंडखोरी करणार याबाबतचे चित्र आज सायंकाळपर्यंत स्पष्ट
होणार आहे.तूर्तास एका जागेसाठी तब्बल सात उमेदवार रिंगणात आहेत.यात विद्यमान प्रभारी नगराध्यक्ष अन्नपूर्णा कोरगावकर यांच्यासह नगरसेवक बाबू कुडतरकर,माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर,दिलीप नार्वेकर,संजू परब,जावेद शेख आणि अमोल साटेलकर आदींचा समावेश आहे.त्यामुळे आज नेमके कोण माघार घेतात आणि कोण लढणार,हे स्पष्ट होणार आहे.
नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या सावंतवाडी नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी निवडणूक अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया आहे.याठिकाणी महाविकास आघाडीच्यावतीने एकच उमेदवार देण्यात येईल,असे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले होते. त्यानुसार काँग्रेसकडून एबी फॉर्म घेऊन रिंगणात असलेल्या नार्वेकर यांची मनधरणी करण्याचे काम केसरकारांकडून सुरू होते.तर भाजप कडून कोरगावकरांना माघार घेण्यास सांगण्यात आले,परंतु त्या आपल्या निर्णयावर ठाम होत्या.त्यामुळे आज अर्ज माघार घेण्याच्या दिवशी उमेदवार काय-काय भूमिका घेतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

4