चक्कर आल्याने पाण्यात पडल्याचा संशय;पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद
सावंतवाडी ता.१९: सांगेली येथील नवपाथर परिसरातील नदीपात्रात आढळून आलेल्या मृतदेहाची ओळख पटली आहे.तो मृतदेह ओवळीये येथील माजी सरपंच शांंताराम शिवराम सावंत (६२) यांचा असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.ते सकाळी आज नेहमी कामानिमित्त घरातून बाहेर पडले होते.आपल्या बागायतीत जाण्यासाठी ते नेहमी शॉर्टकट नदीपात्रातून जात असत,यावेळी त्यांना हृदयविकाराचा झटका आला असावा,असा संशय पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला आहे.याबाबतची माहिती पोलीस हवालदार शरद लोहकरे यांनी दिली.घटनास्थळी पोलिसांनी पंचनामा केला.दरम्यान ग्रामस्थांनी याठिकाणी मोठी गर्दी केली होती.जिल्हा परिषद सदस्य सौ.पल्लवी राऊळ यांचे ते बंधू आहेत.तर पंढरीनाथ राऊळ यांचे ते मेवाणे आहेत.