कातकरी समाजातील लोकांना सौर कंदीलाचे वाटप

144
2

अनुलोम संस्थेचा पुढाकार;चार कुटुंबांना दिला लाभ

वेंगुर्ले ता.१९: अनुलोम परिवाराच्यावतीने आरोंदा-खरीवाडी येथील कातकरी समाज बांधवांना सौर कंदील वाटप करण्यात आले.मुलांच्या अभ्यासासाठी तसेच रात्री उजेडासाठी या कंदीलाचा त्यांना नक्कीचं उपयोग होणार आहे,असा विश्वास यावेळी लाभार्थ्यांकडुन व्यक्त करण्यात आल.
या कार्यक्रमास अनुलोम उपविभागाचे प्रमुख श्री.स्वप्नीलजी सावंत सावंतवाडी भाग जनसेवक श्री.अमित नाईक आरोंदा वस्तिमित्र हनुमंत कुबल,स्थानमित्र तथा गावचे पोलीस पाटील श्री.जितेंद्र जाधव ,रामचंद्र तळवणेकर,विद्यारधर नाईक,विनोद जाधव,सागर रेडकर, सदानंद रेडकर, महेश नाईक, सौरभ नागोळकर,अमित रेडकर,निखिल सोन्सुरकर तसेच आरोंदा व रेडी गावातील युवा वर्ग उपस्थित होता.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जितेंद्र जाधव आणि अमित नाईक यांनी विशेष प्रयन्त केले अन्य सर्वांचे यासाठी सहकार्य लाभले

4