Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
सुभाष देसाई; सर्वोच्च न्यायालयात भक्कमपणे बाजू मांडणार…
नागपूर ता.१९: मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयातील याचिकांमध्ये राज्य शासनाची बाजू मांडणारे वकील बदलल्याच्या काही बातम्या समाजमाध्यमामध्ये तसेच काही वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झाल्या आहेत.या बातम्या तथ्यहीन व दिशाभूल करणाऱ्या आहेत.मराठा आरक्षणासंदर्भात राज्यशासनाची बाजू मांडण्यासाठी यापूर्वी नेमलेले ज्येष्ठ विधिज्ञ हे यापुढेही सर्वोच्च न्यायालयात राज्य शासनाची बाजू भक्कमपणे मांडतील व त्यांच्या नियुक्तीमध्ये राज्यशासनाने कोणताही बदल केलेला नाही,असे निवेदन विधानपरिषदेत सभागृह नेते व उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केले आहे.
Download WordPress Themes Nulled and plugins.