कट्टा-बाजारपेठ येथील ३० वर्षीय तरुण बेपत्ता…

2

मालवण, ता. १९ : कट्टा बाजारपेठ येथील दिपक दिनेश राऊळ (वय-३०) हा तरूण कट्टा बाजारपेठ येथून बेपत्ता झाल्याची घटना घडली आहे. याबाबत त्याचा भाऊ गुरूप्रसाद राऊळ यांनी येथील पोलिस ठाण्यात खबर दिली आहे.
कट्टा बाजारपेठ येथील दीपक राऊळ याने काही काळ स्टेट बँकेत शिपाई म्हणून काम केले होते. सध्या तो कट्टा बाजारपेठ येथे फळ विक्रीचा व्यवसाय करत होता. ७ डिसेंबरला सायंकाळी साडे सात वाजता दिपक हा कट्टा बाजारपेठ येथून बेपत्ता झाला आहे. दिपक हा दोन महिन्यांपूर्वी असाच घरातून निघून गेला होता. त्यानंतर तो घरी परतला होता. अधिक तपास कट्टा पोलिस दूरक्षेत्रचे रुक्मांगत मुंडे हे करत आहेत.

4