माघी गणेश चौक ते कन्याशाळा रस्त्याचे काम अखेर मार्गी…

282
2
Google search engine
Google search engine
Google search engine

नगरसेवक खोत यांच्या हस्ते शुभारंभ ; नागरिकांतून समाधान…

मालवण, ता. १९ : मालवण पालिका हद्दीतील माघी गणेश चौक ते कन्याशाळा परिसरातील मुख्य रस्त्याच्या खडीकरण, डांबरीकरणाच्या कामाचा शुभारंभ नगरसेवक यतीन खोत यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला.
यावेळी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, मंदार केणी, शिल्पा खोत, आकांक्षा शिरपुटे, सेजल परब, गणेश चिंदरकर, बाबी जोगी, शांती तोंडवळकर, रुजाय फर्नांडिस, संजय गावडे, राजू मालवणकर, सुनीता जाधव, गणेश कुडाळकर, स्वप्नील आचरेकर, अमू हर्डीकर, संजय परब, नंदा सारंग यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
काही वर्षांपूर्वी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या मालवण दौऱ्याच्यावेळी या रस्त्याचे हॉटमिक्स डांबरीकरण करण्यात आले होते. गेल्या काही वर्षात या रस्त्याची डागडुजी झाली नव्हती. या रस्त्याची खड्ड्यांमुळे चाळण झाली होती. आचऱ्याकडे जाणाऱ्या या मुख्य रस्त्याच्या दुरवस्थेमुळे नागरिकांतून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत होती. मात्र नगराध्यक्ष कांदळगावकर यांच्याकडे स्थानिक नगरसेवक यतीन खोत, सुनीता जाधव यांनी सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर या रस्त्याचे काम अखेर हाती घेण्यात आले. हे काम मार्गी लागल्याने वाहनचालक, स्थानिक नागरिकांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

\