चुकीच्या औषधांमुळे माजी सैनिकाच्या डोळ्यांना दुखापत..

2

सिंधुदुर्ग मिलेटरी दवाखान्यातील प्रकार;कानाचे औषध दिले डोळ्यात घालायला…

ओरोस ता ,१९:
सिंधुदुर्गनगरी येथील इ सी एच एस पॉलिक्लिनिक (मिलेक्टरी दवाखाना) येथे एका माजी सैनिकाला डोळ्यात घालण्यासाठी कानात घालण्याचे चुकीचे औषध दिल्याचा गंभीर प्रकार घडला आहे. रामचंद्र लक्ष्मण सावंत असे माजी सैनिकांचे नाव असून त्यांच्यावर पुढील औषधोपचार सुरू आहेत. या चुकीच्या औषधामुळे त्यांच्या डोळ्याला जखमा झाल्या आहेत. या घटनेला पोलिक्लिनिकचे मेडिकल ऑफिसर डॉ पाटणकर यांनीही दुजोरा दिला आहे.
कुडाळ पंचायत समितीचे माजी सभापती मोहन सावंत यांचे वडील तथा शिवापूर येथील माजी सैनिक रामचंद्र लक्ष्मण सावंत हे आपले डोळे तपासण्यासाठी ओरोस येथील इ सी एच एस पॉलिक्लिनिकमध्ये आले होते. त्यांचे डोळे तपासल्यानंतर त्यांना तेथे एक आय ड्रॉप डोळ्यात घालण्यासाठी लिहून देण्यात आला. तो त्यांनी तेथेच औषध कक्षातून घेतला.

4