विकासाच्या गोष्टी सांगितल्या नाहीत…तर संडासच्या टोपल्या सुद्धा उचलल्या…

2

दिलीप नार्वेकर; “मी” योग्य उमेदवार वाटल्यास मला मतदान करा,भावनिक आवाहन…

सावंतवाडी ता.१९: नुसत्या शहर विकासाच्या गप्पा सांगितल्या नाहीत,तर विकास होण्यासाठी प्रयत्न करण्याबरोबरच नागरिकांच्या संडासाच्या टोपल्या सुद्धा उचलण्याचे काम आम्ही केलेले आहे.त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत “नार्वेकर” योग्य उमेदवार वाटल्यास माझ्या पाठीशी ठामपणे उभे रहा,असे भावनिक आवाहन माजी नगराध्यक्ष तथा नगराध्यक्षपदाची काँग्रेसचे उमेदवार दिलीप नार्वेकर यांनी आज येथे केले.याठिकाणी काॅग्रेस पक्ष घराघरात जावा,पक्षाच्या माध्यमातून केलेले काम लोकांपर्यंत पोहोचावे यासाठी मी निवडणूक रिंगणात उतरलो आहे.त्यामुळे काही झाले तरी येथील जनता माझ्या पाठीशी ठामपणे उभी राहील,असा दावा त्यांनी यावेळी केला.
श्री. नार्वेकर यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन आज येथील डाॅ. मिलिंद खानोलकर यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी राजू मसुरकर, रमेश पई, बाळा गावडे,समीर वंजारी,राघू नार्वेकर, मिलिंद सुकी, महेंद्र सांगेलकर,आबा मुंज,दादा परब,सोमनाथ टोमके,चैतन्य सावंत,कौस्तुभ गावडे,साक्षी वंजारी,विभावरी सुकी निता गावडे,परवेझ सय्यद,अमिती मेस्त्री आदी उपस्थित होते.
श्री.नार्वेकर पुढे म्हणाले,गेल्या अनेक वर्षापासून मी राजकारणात सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत आहे.त्यामुळे येथील लोक मला नक्कीच निवडून देतील याचा आम्हाला विश्वास आहे.मी दिखाऊ पणे कोणतेही काम केले नाही,जे केले आहे ते प्रामाणिकपणे केले आहे.सावंतवाडी शहराच्या विकासासाठी अनेक वर्षापूर्वी माझे प्रयत्न सुरू होते.बेरी अॅण्ड बेरी या कंपनीच्या माध्यमातून आपण शहराचा विकास आराखडा तयार केला होता.सावंतवाडी नगरपालिका माझा अभ्यास दांडगा आहे.त्यामुळे येथील नागरिकांनी निश्चित पण माझ्या पाठीशी ठामपणे उभे रहावे,मला नुसती मते न घालता आपत्या पाठीशी ठामपणे उभे राहावे,याची माहिती अन्य मतदाराने द्यावी.

4