अल्पवयीन मुलीचा विनयभंग प्रकरणी एकाला ३ वर्षे सश्रम कारावास…

2

ओरोस ता.१९: अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्या प्रकरणी कणकवली तालुक्यातील कलमठ येथील तुषार मोहन चव्हाण (वय 24) याला दोषी धरून विशेष न्यायाधीश प्रकाश कदम यानी त्याला 3 वर्षे सश्रम कारावास आणि 10 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.

सरकार पक्षाच्या वतीने जिल्हा सरकारी अभियोक्ता संदेश तायशेटे यांनी काम पाहिले. दंडाची रक्कम पीडित मुलीला देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

4