सिंधुदुर्गच्या कन्येची पुणे-भीमज्योती नवोदित काव्य पुरस्कारासाठी निवड…

2

ओरोस ता १९:

सिंधुदुर्गनगरी येथील महाविद्यालयीन विद्यार्थिनी विश्वा महादेव वालावलकर हिची विविध क्षेत्रातील कार्याबद्दल पुणे येथील राष्ट्रीय भीमज्योती साहित्य सामाजिक परिषदेतर्फे भीमज्योती नवोदित काव्य पुरस्कारासाठी निवड करण्यात आली असून, पुणे येथे नुकत्याच पार पडलेल्या समारंभामध्ये मान्यवारांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
सिंधुदुर्गनगरी येथील विश्वा वालावलकर ही शालेय स्तरापासून विविध स्पर्धा परीक्षा, निबंध, लेखन, ललित लेखन, कविता करणे, चित्रकला, रांगोळी स्पर्धा यामध्ये सहभाग घेतला आहे. विविध सामाजिक उपक्रम रक्तदान शिबिरे, बचत गट आदी कार्यात सहभाग घेत असते. तिने हवाईसुंदरी म्हणून कोर्स पूर्ण केल्यानंतर सध्या ती पदवीपर्यंतचे महाविद्यालयीन शिक्षण घेत आहे. सध्या ती उत्कृष्ट कविता करीत असून तिच्या कार्याची दखल घेत नवोदित काव्य पुरस्कारासाठी तिची निवड होऊन पुणे येथे झालेल्या समारंभात तिला हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे . बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू ॲड भीमराव आंबेडकर यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला.

4