सावंतवाडीतील युवकाचा वाढदिनी अनोखा संकल्प…

333
2
Google search engine
Google search engine
Google search engine

नेत्रदानाच्या संकल्पासह,पालिका कर्मचाऱ्यांसोबत घेतला जेवणाचा आनंद…

सावंतवाडी ता.१९: आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून नेत्रदानाचा संकल्प करण्याबरोबर पालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांसोबत जेवणाचा आनंद घेण्याचा वेगळा उपक्रम सावंतवाडीतील युवक मुन्ना उर्फ महादेव आजगावकर यांनी राबवला आहे.नुसती वाढदिवसाची मौजमजा न करता आपल्या माध्यमातून लोकांना व समाजातील तळागाळातील गरजूंना आनंद मिळावायासाठी त्यांनी हा उपक्रम राबविला आहे.विशेष म्हणजे झाराप येथील मतिमंद आश्रमात केक कापला.हा सर्व पायंडा आपले वडील बाळ उर्फ जयराम आजगावकर यांच्याकडुन मिळाल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी त्याच्या मित्रपरिवारासह पालिका कर्मचारी सुभाष कदम,कृष्णा पालयेकर,गणपत कदम,विनोद काष्टे,समीर कदम,सुनील पाटील,संतोष पाटील,सुरेश पाटील,धोंडी अणावकर,सचिन लाखे,दीपक कांबळे,अमित खोरागडे आदींनी त्याला शुभेच्छा दिल्या.

\