Friday, April 18, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्यामाझा राजीनामा एक राजकीय षडयंत्र...

माझा राजीनामा एक राजकीय षडयंत्र…

बबन साळगावकर; सावंतवाडीकर नक्कीच मला स्वीकारतील…

सावंतवाडी.ता,२०:
येथील माजी नगराध्यक्ष तथा अपक्ष उमेदवार बबन साळगावकर यांनी “डोअर टू डोअर” प्रचार करण्यासाठी सुरुवात केली आहे.आपल्या नगराध्यक्ष पदाचा राजीनामा हे राजकीय षडयंत्र होते असे सांगून त्यांनी लोकांना पुन्हा एकदा आपल्याला नगराध्यक्ष म्हणून निवडून द्या अशी भावनिक आवाहन केले आहे.
आज आपल्या कार्यकर्त्यांसोबत त्यांनी प्रचाराला सुरुवात केली.यावेळी घरोघरी जाऊन तुमचा हक्काचा नगराध्यक्ष पुन्हा हवा असेल तर माझ्या पाठीशी राहा असे त्यांनी आवाहन केले आहे.तसेच माझी माझ्या राजीनाम्यामुळे शहरवासियांना झालेल्या त्रासाबद्दल मी दिलगिरी व्यक्त करत आहे.असेही त्यांनी आपल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.त्यांनी प्रसिद्धीपत्रकात च्या माध्यमातून भावनिक आवाहन केले आहे.आपण केलेली विकास कामे गेली.अनेक वर्षे सावंतवाडीकरांशी असलेला संपर्क आदींचा लेखाजोखा पत्रकांच्या माध्यमातून मांडला आहे.आणि विकासासाठी आपल्याला पुन्हा एकदा निवडून द्यावे असे त्यांनी आवाहन केले आहे.यावेळी त्यांच्यासोबत सचिन इंगळे, संदीप नाईक आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments