सावंतवाडीत अर्ध्या किमतीत ब्रँडेड शूज..

2

न्यू स्टेपचे थाटात उद्घाटन;पुमा,वुडलैंड,रिबाॅक, आदींचा समावेश…

सावंतवाडी.ता,२०:
येथे नव्याने सुरु करण्यात आलेल्या न्यू स्टेप्स या ब्रँडच्या दालनाचे उद्घाटन आज येथील राणी पार्वतीदेवी हायस्कूल महाविद्यालयाच्या शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव सोनू सावंत यांच्या हस्ते करण्यात आले.
आजपासून तब्बल दहा ते बारा दिवस या दालनात पुमा, वुडलैंड, रीबॉक,नायकी अशा विविध कंपनीचे ब्रँडेड शूज अर्ध्या किमतीत उपलब्ध होणार आहे. याचा फायदा जास्तीत जास्त लोकांनी घ्यावा असे आवाहन प्रोप्रायटर मिलिंद उर्फ पिंट्या देसाई यांनी केले आहे.येथील संचयनी पॅलेसच्या समोर असलेल्या अथर्व आर्केड येथे हे दालन सुरू करण्यात आले आहे.आज यांचे धुमधडाक्यात उद्घाटन करण्यात आले.
यावेळी जिल्हा सरपंच संघटनेचे पदाधिकारी प्रेमानंद देसाई,डाॅ. विद्यानंद देसाई,सुचीता देसाई, शिवराम देसाई, प्रदीप देसाई, स्वप्निल देसाई, अमोल जंगले, यशवंत नार्वेकर, मीरा देसाई,सुरज कारिवडेकर, राजू कासकर,आशिष सुभेदार, साक्षी कारिवडेकर,अमेय मोरे,वीरेंद्र मोरे आदी उपस्थित होते.

7

4