- कुडाळ ता.२०: तालुका खरेदी-विक्री संघाचा भात खरेदी शुभारंभ २३ डिसेंबरला होणार आहे.ही भात खरेदी ऑनलाईन पद्धतीने होणार असून या खरेदीसाठी क्विंटल मागे १८१५ रुपये व ५०० रुपये बोनस थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.याचा लाभ जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी घ्यावा,असे आवाहन आमदार वैभव नाईक यांनी केले आहे.
यासाठी संबंधित शेतकऱ्याना सातबारा उतारा , आधारकार्ड झेरॉक्स, बँक पासबुकची झेरॉक्स आणणे आवश्यक आहे.सिंधुदुर्गात भात हे प्रमुख पीक असून मोठ्या प्रमाणात शेतकरी भात शेती करतात येथील शेतकरी सदन व्हावा यासाठी आमदार वैभव नाईक हे शेतकऱ्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी सर्वोतपरी प्रयत्न करत आहेत.आ.दीपक केसरकर यांनी आणलेली चांदा ते बांदा योजनाहि प्रभावीपणे राबविली जात आहेत.येथील शेतकरी यांत्रिकीकरणाद्वारे शेती करावा यासाठी दीपक केसरकर व वैभव नाईक यांच्या माध्यमातून कुडाळ तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांना चांदा ते बांदा योजनेतून बी बियाणे, यंत्रसामुग्री, शेतकरी गटांना शेती अवजारे अनुदानातून देण्यात आली आहेत.याचा वापर शेतकरी करू लागले असून कुडाळ तालुका शेती क्षेत्रात अग्रेसर बनला आहे.शेतकऱ्यांनी घेतलेल्या भात उत्पादनाची शासनाने खरेदी करावी व चांगला दर द्यावा यासाठी त्यांनी प्रयत्न केले त्यानुसार गतवर्षी शासनाकडून क्विंटलमागे १७५० रु व बोनस ५०० रु असे २२५० रु शेतकऱ्यांच्या थेट खात्यात जमा झाले होते.यावर्षी गतवर्षी पेक्षा क्विंटलमागे १०० रु चा दर शासनाने वाढवून दिला आहे. यापेक्षाही अधिकचा दर मिळावा यासाठी श्री.नाईक प्रयत्नशील आहेत.