सिंधुदुर्ग जिल्हा ग्रंथालयाचे २२ डिसेंबरला वार्षिक अधिवेशन

2

ओरोस ता २०:  सिंधुदुर्ग जिल्हा ग्रंथालय संघ आणि शारदा ग्रंथालय कसाल यांच्या संयुक्त विद्यमाने सिंधुदुर्ग जिल्हा ग्रंथालय संघ वार्षिक अधिवेशन कसाल येतील धी पंचक्रोशी शिक्षण संस्था येथे रविवार 22 डिसेंबर रोजी सकाळी नऊ वाजता आयोजित करण्यात आले आहे यावेळी सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन शारदा ग्रंथालय चे अध्यक्ष प्रकाश नारकर यांनी केले आहे. ग्रंथालय संघाचे वार्षिक अधिवेशन सकाळी नऊ ते सायंकाळी पाच या वेळेत संपन्न होणार आहे. सिंधुदुर्ग जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष अनंत वैद्य यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम होणार आहे. सकाळी 9 ते 10 या वेळेत शारदा ग्रंथालय कसाल बाजार पेठ ते अधिवेशन स्थळ यादरम्यान ग्रंथदिंडी निघणार आहे. सकाळी 10 वाजता प्रतिनिधींची नोंदणी व परिचय, 10.30 वाजता अधिवेशन उद्घाटन सोहळा, त्यानंतर शारदा ग्रंथालय कसाल यांच्या वतीने विशेष सत्कार, जिल्हा ग्रंथालय संघाचे जिल्हास्तरीय पुरस्कार वितरण, दुपारी 2.30 वाजता ग्रंथालयाचे समस्या व शंका समाधान व खुले अधिवेशन या विषयावर एस एच राठोड, एस जी इंगोले, प्रतिभा ताटे या मार्गदर्शन करणार आहेत. सायंकाळी 4.30 वाजता समारोप होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ पत्रकार विजय शेट्टी, धी कसाल पंचक्रोशी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष भाई सावंत, ग्रंथालय संचालक सुभाष राठोड, कोकण विभाग सहायक संचालक शालिनी इंगोले, जिल्हा ग्रंथालय अधिकारी प्रतिभा ताटे, कसाल सरपंच संगीता परब, पंचायत समिती सदस्य गोपाळ हरमलकर, ज्येष्ठ पत्रकार विजय मांडे, उपाध्यक्ष धाकू तानावडे, चित्रा देसाई, सचिव सखाराम हरमलकर, यशवंत परब, मुख्याध्यापक गुरुदास कुसगावकर उपस्थित राहणार आहेत.

4