Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
कुजल्यामुळे ओळख पटवण्यात अपयश;जागरूक नागरिकांमुळे प्रकार उघड…
सावंतवाडी ता.२०: येथील उपरलकर देवस्थान परिसरात असलेल्या गवळी देवस्थानाच्या बाजूला एका अज्ञात तरुणाचा मृतदेह गळफास लावलेल्या अवस्थेत आढळून आला आहे.ही घटना आज सायंकाळी उघडकीस आली.याबाबतची माहिती भाजपाचे शहराध्यक्ष प्रसाद अरविंदेकर यांनी दिली.दरम्यान मृतदेह सडून गेल्यामुळे तो नेमका कोणाचाआहे, ही माहिती मिळणे अशक्य आहे,असे त्यांचे म्हणणे आहे.
गवळी समाजातील काही लोक आपल्या देवस्थानाकडे पूजेसाठी गेले होते.त्यावेळी हा प्रकार उघड झाला,असे त्यांचे म्हणणे आहे.याबाबतची माहिती अरविंदेकर यानी पोलिस ठाण्यात दिली आहे.
Download WordPress Themes Nulled and plugins.