अनधिकृत स्कुबा व्यावसायिकांचे १७ सिलिंडर जप्त…

311
2

बंदर विभागाची कारवाई ; संबंधितांवर दंडात्मक कारवाई होणार…

मालवण, ता. २० : मालवणच्या समुद्रात किल्ला परिसरात अनधिकृतरीत्या स्कूबा डायव्हिंग करणार्‍या व्यावसायिकांचे १७ सिलिंडर बंदर विभागाने आज जप्त केले. संबंधितांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे असे बंदर निरीक्षक सुषमा कुमठेकर यांनी सांगितले. बंदर विभागाच्या कारवाईमुळे अनधिकृत व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत.
मालवण समुद्रात अनधिकृतरीत्या स्कूबा डायव्हिंग व्यवसाय सुरू असल्याच्या तक्रारी बंदर विभागास प्राप्त झाल्या होत्या. त्यामुळे प्रादेशिक बंदर अधिकारी कॅप्टन सूरज नाईक यांच्या आदेशानुसार आज बंदर विभागाच्यावतीने धडक कारवाई मोहिम हाती घेण्यात आली. यात किल्ला परिसरात व्यवसाय करणार्‍या स्कूबा डायव्हिंग व्यावसायिकांचे १७ सिलिंडर जप्त करण्यात आले. संबंधितांविरोधात दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. बंदर निरीक्षक सुषमा कुमठेकर, वेंगुर्लेचे सहायक बंदर निरीक्षक उमेश महाडिक, शिपाई साहेबराव कदम, धनाजी चोडणेकर यांनी ही कारवाई केली. जप्त केलेले सिलिंडर बंदर कार्यालयात ठेवण्यात आले आहेत.

4