तो” मृतदेह निपाणी येथील मजुराचा…

2

गळफास लावलेल्या स्थितीत मृतदेह;आत्महत्या असल्याचा पोलिसांचा संशय…

सावंतवाडी ता.२०: येथील उपरलकर देवस्थाना नजीक जंगलमय परिसरात आढळलेल्या मृतदेहाची ओळख पटविण्यास अखेर सावंतवाडी पोलिसांना यश आले.तो मृतदेह निपाणी येथील दवाल सय्यद नामक मजुराचा असल्याचे पोलिसांनी सांगितले.दरम्यान त्याने आत्महत्या केली असावी,असा संशय पोलिसांनी वर्तवला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,आज सायंकाळच्या सुमारास परिसरातील काही नागरिकांना हा मृतदेह गळफास लावलेल्या स्थितीत आढळून आला होता.तो मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली होती.याबाबतची माहिती सावंतवाडी पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेहाची ओळख पटविण्याचे कार्य सुरू केले होते.अखेर त्या मृतदेहाची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आले आहे.दरम्यान तो घातपात नसून आत्महत्या आहे,असे पोलिसांचे म्हणणे आहे.

4