Wednesday, December 4, 2024
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्याकेसरकर आणि माझ्यात वितुष्ट आणण्यासाठी काहींकडून षडयंत्र...

केसरकर आणि माझ्यात वितुष्ट आणण्यासाठी काहींकडून षडयंत्र…

बबन साळगावकरांचा आरोप;त्यांच्याशी माझे कौटुंबिक संबंध कायम राहतील…

सावंतवाडी त.२१: केसरकर आणि माझ्यात दरी निर्माण करण्यासाठी काहींकडून प्रयत्न केले जात आहेत माझा राजीनामा हे त्याच लोकांकडून रचण्यात आलेले एक राजकीय षडयंत्र होते,असा आरोप माजी नगराध्यक्ष तथा नगराध्यक्ष पदाचे अपक्ष उमेदवार बबन साळगावकर यांनी आज येथे केला.केसरकर आणि माझे पूर्वीपासूनचे कौटुंबिक संबंध आहेत,आणि ते यापुढेही कायम राहतील असेही त्यांनी सांगितले.शहराचा पारदर्शक कारभार येथील जनतेला पुन्हा हवा आहे.तो कायम राहण्यासाठी जनतेनेचं माझ्याकडे निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली आहे.त्यामुळे मी पुन्हा या निवडणुक रिंगणात उतरलो,आणि ते मला नक्कीच निवडून देतील,असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.याबाबत त्यांनी पत्रकार परिषद घेतली,यावेळी ते बोलत होते.

श्री.साळगावकर पुढे म्हणाले,केसरकर आणि माझ्यातील कौटुंबिक संबंध आजही कायम आहेत.नुकतीच मी त्यांच्याशी सकारात्मक चर्चादेखील केली आहे,त्यामुळे हे षड्यंत्र रचणाऱ्यांची पोल-खोल मी निवडणुकीनंतर नक्कीच करेन,असेही त्यांनी सांगितले.यावेळी संदीप नाईक,सचिन इंगळे,सत्यम सावंत,बंड्या तोरसकर,गुरुनाथ वारंग आदी उपस्थित होते.
मी नगराध्यक्षपदाच्या निवडणूक रिंगणात अपक्ष उमेदवार असल्याने याचा फायदा भाजपाला नक्कीच होईल,असा दावा भाजपाच्या काही नेत्यांकडून केला जात आहे.मात्र असे काही होणार नाही,मी निवडणूक लढवावी ही जनतेची इच्छा आहे.आणि ती जिंकण्याच्या उद्देशानेच मी लढवत आहे. त्यामुळे भाजपाने चुकीच्या पद्धतीने प्रचार करू नये,नगराध्यक्षपदासाठी निवडणूक रिंगणात असलेले सर्वच उमेदवार हे नवखे आहेत,त्यांना कोणताही अनुभव नाही.त्यांनी शहराच्या विकासासाठी कोणताही हातभार लावला नाही,त्यामुळे येथील जनता त्यांना स्वीकारणार नाही,ते नक्कीच माझ्या पाठीशी राहतील आणि मला विजयी करतील असे त्यांनी सांगितले.
सावंतवाडीतील जनता सुज्ञ आहे.मी माझ्या कारकिर्दीत पारदर्शक आणि भ्रष्टाचार विरहित नगराध्यक्ष पदाचा कारभार हाताला आहे. हे येथील जनतेने सुद्धा पाहिले आहे.पाणी लाईट व कचऱ्याचे योग्य विघटन यासारखे महत्त्वपूर्ण प्रकल्प याठिकाणी राबविले आहेत. मात्र हे सर्व करत असतानाच अचानक माझ्या राजीनाम्यामुळे येथील जनतेला त्रास सहन करावा लागला. त्याबद्दल मी त्यांची दिलगिरी व्यक्त करतो,मात्र येत्या निवडणुकीत ते नक्कीच माझी साथ देतील आणि माझ्या शिलाई मशीन चिन्ह समोरील बटन दाबून मला नक्कीच विजयी करतील,असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments