सावंतवाडीतील घटना;गळफास लावलेल्या स्थितीत आढळला होता मृतदेह…
सावंतवाडी ता.२१: येथील उपरलकर देवस्थाना नजीक जंगलमय परिसरात आढळलेला दावल बालासाब सय्यद(५५) रा.निपाणी या तरुणाचा मृतदेह शवविच्छेदनानंतर आज सकाळी सावंतवाडी पोलिसांनी त्याच्या नातेवाईकांच्या ताब्यात दिला.ही घटना काल सायंकाळी उघडकीस आली होती.दरम्यान मृतदेहाची ओळख पटविण्याचे कार्य पोलिसांकडून सुरू होते.अखेर उशिरा तो मृतदेह दावल सय्यद नामक तरुणाचा असल्याचे निष्पन्न झाले.त्यानंतर त्याचा मुलगा कबीर सय्यद यांनी मृतदेहाची ओळख पटवून तो मृतदेह ताब्यात घेतला.याबाबतची माहिती सावंतवाडी पोलीस उपनिरीक्षक अमित गोते यांनी दिली.
काल सायंकाळी संबंधित परिसरात दुर्गंधी पसरल्याने तेथील काही नागरिकांनी त्या परिसराची पाहणी केली.दरम्यान त्या ठिकाणी गळफास लावलेल्या स्थितीत व सडलेल्या अवस्थेत त्यांना एक मृतदेह आढळून आला होता.त्यानंतर याबाबतची खबर सावंतवाडी पोलिस ठाण्यात देण्यात आली होती.मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्यामुळे त्याला दोन ते तीन दिवस झाले असावेत,असा अंदाज पोलिसांकडून वर्तविण्यात आला होता.दरम्यान काल रात्री उशिरा त्या मृतदेहाची ओळख पटल्यानंतर संबंधित तरुण वेंगुर्ला शिरोडा येथील वरचीकेरवाडी येथे बोटीवर कामाला असल्याचे समजले ₹,काही दिवसांपूर्वी तो निपाणी येथील आपल्या गावी गेला होता,असे त्याच्या मालकाकडून सांगण्यात आले.दरम्यान गावाकडून तो पुन्हा याठिकाणी परतत असताना त्याने हा प्रकार केला असावा,असे त्यांनी सांगितले.मृतदेहा शेजारी आढळलेल्या बॅगेत सापडलेल्या बोनाफाईट सर्टिफिकेटावरून सावंतवाडी पोलिसांनी त्याची ओळख पटविली.याबाबत अधिक तपास सावंतवाडी पोलिस करत आहेत.