सावंतवाडी ता.२१: कोलगाव येथिल ग्रामदेवता श्री देवी सातेरी मंदिराचा भुमिपुजन सोहळा उद्या दिनांक २२डिसेंबर रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांनी संपन्न होणार आहे.यानिमित्ताने आज सायंकाळी पाच वाजता कुळाच्या घराकडुन तरंगकाठी सह पालखी मिरवणुक सातेरी मंदिर कडे वाजत गाजत रवाना होणार आहे .तर उद्या सकाळी देवीची पूजा व ९:४५ वाजण्याच्या मुहूर्तावर भूमिपूजन सोहळा होणार आहे.
भाविकांनी यांचा लाभ घ्यावा असे आवाहन सातेरी देवस्थान कमिटीच्या वतीने चंदन धुरी यांनी केले आहे .श्री देवी सातेरी मंदिराच्या बांधकामासाठी रोख व वस्तू रूपाने जास्तीत जास्त सढळ हस्ते देणगी देऊन सहकार्य करावे संर्पक चंदन धुरी 9422782872 , भाई धुरी 9970545355