आसोली हायस्कूल केंद्राच्या राष्ट्रभाषा हिंदी परीक्षेचा निकाल १०० टक्के…

179
2

वेंगुर्ले ता.२१: तालुक्यातील आसोली हायस्कूल केंद्राच्यावतीने यावर्षी घेण्यात आलेल्या राष्ट्रभाषा हिंदी परीक्षेचा निकाल शंभर टक्के लागला आहे.यात बाल प्रबोधिनी परीक्षेत पवन दीपक घाडी,प्राथमिक परीक्षेत मृणालिनी ज्ञानदेव धुरी तर सुबोध परीक्षेत उत्तम विश्वजीत चिपकर या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक पटकाविला.या यशाबद्दल त्यांचे सर्व स्तरावरून कौतुक होते.
बाल प्रबोधिनी परीक्षेत समृद्धी संतोष जाधव,अथर्व अभिजीत सोन्सुरकर,हेमांगी एकनाथ आरोंदेकर यांनी द्वितीय क्रमांक पटकाविला.तर प्रतीक रमेश धुरी याने तृतीय क्रमांक प्राप्त केला असून सर्व विद्यार्थ्यांना प्रथम श्रेणी प्राप्त झाली.
प्राथमिक परीक्षेत सानवी साहेबराव पाटकर-द्वितीय,नितेश नारायण धुरि याने तृतीय क्रमांक प्राप्त केला असून विशेष योग्यता प्राप्त केली.
सुबोध परीक्षेत उत्तम प्रेरणा संतोष बेर्डे-द्वितीय,अथर्व कृष्णा धुरी-तृतीय क्रमांक प्राप्त केला असून विशेष योग्यता श्रेणी प्राप्त केली.
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना श्री .ठोकरे,विद्या विकास मोरे,सौ.गावडे,विशाखा वेंगुर्लेकर यांचे मार्गदर्शन लाभले.या यशाबद्दल संस्थाध्यक्ष उदय धुरी,सेक्रेटरी आनंद गावडे तसेच ग्रामस्थ,सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व पालकांनी अभिनंदन केले.

4