वेंगुर्ले-आदर्श शिक्षकेतर कर्मचारी पुरस्कार सावळाराम जाधव यांना जाहीर…

2

वेंगुर्ले ता.२१: तालुका माध्यमिक शिक्षकेतर कर्मचारी संघातर्फे देण्यात येणारा यावर्षीचा आदर्श शिक्षकेतर कर्मचारी पुरस्कार असोली हायस्कूलचे कर्मचारी सावळाराम नाना जाधव यांना जाहीर झाला आहे.या यशाबद्दल त्यांचे सर्व स्तरावरून कौतुक होत आहे.

श्री.जाधव यांनी संस्था स्थापनेपासूनच्या कार्यात आपले अनमोल योगदान दिले आहे.तर असोली हायस्कूल स्थापन झाल्यापासून आज पर्यंत ते नाईक या पदावर कार्यरत आहेत.त्याचबरोबर त्यांनी सामाजिक संस्थांना देणगी उपलब्ध करून देण्यासाठी सुद्धा अनेक नाटकांमधून आपली अभिनयकला जोपासत समाजसेवा व रंगभूमीची सेवा केले आहे.

4