बांदा येथील व्ही.एन.नाबर प्रशालेत पालक क्रीडा दिन साजरा…

2

बांदा.ता,२१: 
कामत चॅरिटेबल ट्रस्ट संचलित येथील व्ही. एन. नाबर प्रशालेत पालक क्रीडा दिन साजरा करण्यात आला. यादिवशी पालकांनी आपल्या पाल्यांच्या उपस्थितीत विविध मैदानी क्रीडाप्रकारात सहभाग घेतला. पालकांनी मोकळेपणाने सहभाग घेत ‘बचपन आफ्टर पचपन’ अनुभवले.
सरपंच अक्रम खान यांच्या हस्ते क्रीडाज्योत प्रज्वलित करून पालक क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर मनोज कामत, शिक्षक-पालक संघाच्या उपाध्यक्षा अमृता महाजन, ओंकार मालवणकर, निलेश मोरजकर, श्रुती कल्याणकर, निलेश मोरजकर, अविनाश पंडित, प्रशांत गावकर, रसिका वाटवे, हेलन रोड्रीग्स आदी मान्यवर उपस्थित होते.
स्वागत व प्रास्ताविक रसिका वाटवे यांनी केले. शाळा व पालक यामच्यामधील नाते अधिक दृढ व्ह्यावे, पालकांना शाळा आपली वाटावी, शाळेबद्दल ओढ वाटावी, शाळेच्या सर्वतोपरी प्रगतीसाठी पालकांचा हातभार लागावा या उद्देशाने पालक क्रीडा महोत्सव साजरा करण्याचा उपक्रम प्रशाळेने राबविल्याचे वाटवे यांनी सांगितले.
सरपंच अक्रम खान यांनी आजच्या धकाधकीच्या जीवनात मैदानी खेळ आवश्यक असल्याचे सांगितले. आपण राष्ट्रीय खेळाडू असल्याने खेळ किती महत्वाचे आहेत याची मला जाणीव आहे.
यावेळी महिला व पुरुष पालकांनी १०० मीटर धावणे, संगीत खुर्ची, लांब उडी, डॉज बॉल, गोळाफेक, भालाफेक, क्रिकेट, रस्सीखेच अशा विविध क्रीडाप्रकारात सहभाग घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चित्रलेखा नाईक यांनी केले. आभार रिना मोरजकर यांनी मानले.

4