विविध मागण्यांकडे वेधले लक्ष;मागण्या पूर्ण न झाल्यास आझाद मैदानावर आंदोलन…
ओरोस ता २१:
‘एकच मिशन, जुनी पेंशन’, ‘कोण म्हणतोय देणार नाय, घेतल्या शिवाय जाणार नाय’, ‘प्राथमिक शिक्षक संघाचा विजय असो’ आदि विविध गगनभेदी घोषणा देत अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाने आपल्या विविध मागण्यांकडे शनिवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन छेडले. शासनाचे लक्ष वेधण्यासाठी छेडण्यात आलेल्या हे आंदोलन गंभीर घेतले गेले नाही तर २० जानेवारीला आझाद मैदानावर आंदोलन छेडण्याचा निर्धारही यावेळी करण्यात आला.
जुनी पेन्शन योजना सह शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाने पुकारलेल्या राज्यव्यापी धरणे आंदोलनात सहभागी होत अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाने माजी राज्याध्यक्ष प्रकाश दळवी यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन छेडले. यावेळी राज्य संयुक्त चिटणीस महादेव देसाई, जिल्हाध्यक्ष के टी चव्हाण, गुरुदास कुबल, विजय केळकर, स्वप्नाली सावंत, नागेश गावडे यांच्यासह अनेक शिक्षक उपस्थित होते.



