सावंतवाडी शिवसेना तालुका पदाधिकाऱ्यांची उद्या बैठक

2

सावंतवाडी ता.२१:येथील नगराध्यक्षपद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील शिवसेना पदाधिकार्‍यांची बैठक उद्या दिनांक २२ डिसेंबर रोजी सकाळी ११ वा. येथील श्रीधर अपार्टमेंटमध्ये आयोजित करण्यात आली आहे.याबाबतची माहिती तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.
या बैठकीला उपतालुकाप्रमुख ,विभाग प्रमुख,जिल्हा परिषद सदस्य,पंचायत समिती सदस्य,उपविभाग प्रमुख,शाखा प्रमुख ,महिला आघाडी प्रमुख,युवासेना उपजिल्हाधिकारी व ग्राहक संरक्षण तालुकाध्यक्ष यांनी उपस्थित राहावे,असे आवाहन श्री.राऊळ यांनी केले आहे.

4