Wednesday, December 4, 2024
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्यादेवगड समुद्रात एलईडी ट्रॉलर पकडला...

देवगड समुद्रात एलईडी ट्रॉलर पकडला…

मत्स्यव्यवसाय विभागाची कारवाई ; संबंधित ट्रॉलर देवगडचा…

मालवण,ता.२१ : देवगड समुद्रात अवैधरित्या मासेमारी करताना एक ट्रॉलर मत्स्य व्यवसाय विभागाच्या पथकाने पकडला. या ट्रॉलरवर एलईडी दिवे, जनरेटर, पर्ससीन जाळी आढळून आली असून हा ट्रॉलर ताब्यात घेत मालवण बंदरात आणण्यात आला आहे. त्यावरील कार्यवाही सुरू असल्याची माहिती मत्स्य परवाना अधिकारी शिवराज चव्हाण यांनी दिली.
अवैधरीत्या एलईडीद्वारे मासेमारी करणार्‍यांविरोधात मत्स्य व्यवसाय विभागाने धडक कारवाई मोहीम सुरू केली आहे. काही दिवसांपूर्वी गोव्यातील दोन एलईडी ट्रॉलर पकडण्यात आले होते. या दोन्ही ट्रॉलरवर दंडात्मक कारवाई करून जप्त करण्याचे आदेश तहसीलदार अजय पाटणे यांनी दिले. त्यानंतर काल रात्री साडे बारा वाजता देवगड समुद्रात गस्त घालत असताना मत्स्य व्यवसाय विभागाच्या पथकास देवगड बत्ती येथील २२ वाव समुद्रात अवैधरीत्या मासेमारी करण्याच्या तयारीत असलेला एक ट्रॉलर दिसून आला. त्याची तपासणी केली असता त्यात ट्रॉलरवर चार एलईडी बल्ब, एक जनरेटर, पर्ससीनची जाळी सापडून आली. त्यामुळे हा ट्रॉलर मालवण बंदरात आणण्यात आला. हा ट्रॉलर देवगड येथील असल्याची माहिती मत्स्यव्यवसाय विभागाच्या अधिकार्‍यांनी दिली. गोव्यातील जप्त केलेले ट्रॉलर देवगड येथे हलविण्याची कार्यवाही सुरू आहे. त्यामुळे काल पकडलेल्या ट्रॉलरवरील कार्यवाही सुरू असल्याची माहिती देण्यात आली.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments