खांबाळे प्रभागस्तरीय बाल, कला व क्रीडा स्पर्धा अरूळे येथे संपन्न
वैभववाडी.ता,२२: अरुळे येथे पार पडलेल्या प्रभागस्तरीय बाल, कला क्रीडा स्पर्धा व ज्ञानी मी होणार महोत्सवात समुहनृत्य स्पर्धेत वि. मं. करुळ गावठाण अ प्रशालेने प्रथम क्रमांक पटकाविला. तसेच लोरे हेळेवाडी व शिराळे प्रशालेने या स्पर्धेत चांगली कामगिरी केली.
खांबाळे प्रभागस्तरीय स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे – ५० मीटर धावणे लहान गट मुलगे- प्रथम लंकेश राजेंद्र पांचाळ कोकिसरे महालक्ष्मी, द्वितीय रितेश रमाकांत भिसे कोकिसरे बांधवाडी, मुली- प्रथम रिया दत्ताराम देसाई खांबाळे धनगरवाडी, द्वितीय रिया संतोष बाणे कोकिसरे बांबरवाडी, १०० मीटर धावणे लहान गट मुलगे- प्रथम कार्तिक बाबू पवार खांबाळे नं. १, द्वितीय तन्मय सिताराम रानवसे कोकिसरे महालक्ष्मी, मुली- प्रथम स्वाती अंबिका चव्हाण कोकिसरे नारकरवाडी, द्वितीय आर्या रविंद्र सकपाळ.
कुर्ली नं. १, १०० मीटर धावणे मोठा गट मुलगे- प्रथम राज सुभाष कदम गडमठ नं.१, द्वितीय यश अरुण पाटील शिराळे, मुली प्रथम प्राची औदुंबर तळेकर कुंभवडे नं.१, द्वितीय साक्षी अंबाजी बोडेकर शिराळे, २०० मीटर धावणे मोठा गट मुलगे- प्रथम विनायक विजय नेमण लोरे हेळेवाडी, द्वितीय आर्यन गणेश मांजलकर लोरे नं.१, मुली- प्रथम सानिका संतोष आग्रे लोरे हेळेवाडी, द्वितीय नमिता नामदेव वारेसे लोरे हेळेवाडी, रिले लहान गट मुलगे- प्रथम भावेश सुनिल आग्रे, विजय नामदेव वारेसे, राज विजय मांडवकर, प्रणव विठोबा गोरुळे लोरे हेळेवाडी, मुली- कल्याणी सुधाकर लाड.
कोकिसरे महालक्ष्मी, रिया दत्ताराम देसाई खांबाळे धनगरवाडी, तनुजा सिताराम राणवसे खांबाळे धनगरवाडी, संपदा प्रदीप चव्हाण खांबाळे धनगरवाडी, उंच उडी लहान गट मुलगे- प्रथम सिध्देश उमेश डेळेकर शिराळे, द्वितीय निखिल दिपक मोंडकर आचिर्णे कडुवाडी, मुली- प्रथम सलोनी सुभाष शिवगण करुळ गावठण अ, द्वितीय आर्या रविंद्र सकपाळ कुर्ली नं.१, उंच उडी मोठा गट मुलगे- प्रथम सुमित उत्तम पेडणेकर लोरे नं.१, द्वितीय यश अरुण पाटील शिराळे, मुली- प्रथम पुजा अनंत पाटील शिराळे, द्वितीय रिया राजाराम पालांडे कुंभवडे नं.१, ज्ञानी मी होणार लहान गट – प्रथम इंद्राणी राजेंद्र माने कोकिसरे खांबलवाडी व लावण्या सुभान नवलू कोकिसरे खांबलवाडी, ज्ञानी मी होणार मोठा गट- प्रथम साक्षी अंबाजी बोडेकर शिराळे, आकांक्षा अजित पाटील.
शिराळे, रिले मोठा गट मुलगे- प्रथम सुमित उत्तम पेडणेकर लोरे नं.१, विनायक विजय नेमण लोरे हेळेवाडी, राज सुभाष कदम गडमठ नं.१, अमोल संतोष कदम गडमठ नं.१ मुली- प्रथम नमिता नामदेव वारेसे लोरे हेळेवाडी, सानिका संतोष आग्रे लोरे हेळेवाडी, समिक्षा रामदास शेलार गडमठ नं., अमृता अनिल नराम लोरे नं.१, गोळाफेक मुलगे- प्रथम प्रलय दिपक भडेकर लोरे हेळेवाडी, द्वितीय गुरुनाथ चंद्रकांत आग्रे लोरे हेळेवाडी, मुली- प्रथम रिया राजाराम पालांडे कुंभवडे नं.१, आयल विकास चव्हाण कुर्ली नं.१, लांब उडी लहान गट- मुलगे प्रथम निखिल दिपक मोंडकर आचिर्णे कडुवाडी, द्वितीय सुजल सुभाष कदम गडमठ नं.१ मुली- प्रथम सान्वी शांताराम राणे कुर्ली नं.१, द्वितीय संपदा प्रदीप चव्हाण कोकिसरे महालक्ष्मी.
लांब उडी मोठा गट मुलगे- प्रथम विराज विकास शिंदे कुंभवडे नं.१, द्वितीय सुमित उत्तम पेडणेकर लोरे नं.१ या शाळांनी व विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. स्पर्धेचे पारितोषिक वितरण शिक्षण विस्तार अधिकारी निसार नदाफ यांच्या उपस्थितीत पार पडले. यावेळी अरुळे सरपंच उज्वल नारकर, अरूळे विद्यालयाचे मुख्याध्यापक पी.एन. साळुंखे, केंद्र प्रमुख व शिक्षक उपस्थित होते.