गोव्यात पत्रकार संरक्षण कायद्यासाठी प्रयत्न सुरू…

2

प्रमोद सावंत;राज्यातील पत्रकारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट…

पणजी.ता,२२: महाराष्ट्राच्या धर्तीवर गोव्यात देखील पत्रकार संरक्षण कायदा लागू करण्यात येईल आणि त्यासंबंधीचे विधेयक उन्हाळी अधिवेशनात मांडण्यात येईल असे आश्वासन गोव्याचे मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत यांनी दिले.मराठी पत्रकार परिषदेच्या पदाधिकरयांची दोन दिवसीय कार्यशाळा सावंतवाडी येथे आयोजित करण्यात आली आहे.
त्याचा एक भाग म्हणून परिषदेच्या पत्रकारांनी सांखळी येथील रवी भवनमध्ये मुख्यमंत्र्यांची भेट घेतली.प्रारंभी एस. एम.देशमुख यांनी मुख्यमंत्र्यांचा सत्कार करून गोव्यात पत्रकार संरक्षण कायदा लागू करावा, आणि गोव्यातील शासकीय विश्रामगृहात महाराष्ट्रातील पत्रकारांसाठी राखीव कक्ष ठेवावा अशी मागणी केली.प्रमोद सावंत यांनी दोन्ही मागण्या मंजूर केल्या आहेत. कायदा विभागाशी चर्चा करून पुढील अधिवेशनात पत्रकार संरक्षण कायद्यांचे विधेयक आणून ते मंजूर करून घेण्यात येईल असे आश्वासन त्यांनी दिले. उपस्थित सर्व पत्रकारांनी या घोषणेचे टाळ्यांच्या गजरात स्वागत केले.
यावेळी परिषदेचे विश्वस्त किरण नाईक,अध्यक्ष गजानन नाईक, कार्याध्यक्ष शरद पाबळे,तरूभारतचया गोवा आवृत्तीचे संपादक सागर जावडेकर व अन्य ६० पदाधिकारी उपस्थित होते.

4