यशवंत आठलेकरांचा भाजपाला तडकाफडकी रामराम…

2

पदासह पक्ष सदस्यांचा राजीनामा;नाराज नाही,मात्र नवोदितांना संधी देण्याची मागणी…

दोडामार्ग ता.२२: भाजपाचे जिल्हा सरचिटणीस तथा पक्षाचे ज्येष्ठ नेते यशवंत आठलेकर यांनी आपल्या पदाचा व भाजप सदस्यत्वाचा आज राजीनामा दिला आहे.आपण पक्षात कोणावर नाराज नाही,फक्त प्रकृती अस्वास्थ्यामुळे आपण ही भूमिका घेत आहोत.मात्र आता नवोदितांना संधी मिळावी,अशी आपली धारणा आहे,असे त्यांनी आयोजित पत्रकार परिषदेत घोषित केले.
त्यांच्याकडून अचानक राजीनामा देण्यात आल्यामुळे चर्चेला उधाण आले आहे.श्री.आठलेकर भाजपाचे जुनेजाणते पदाधिकारी मानले जातात.भाजप पक्ष जिल्ह्यात वाढवण्यासाठी त्यांचे मोलाचे योगदान होते.भाजपाकडून त्यांना वारंवार संधी देण्यात आली होती.त्यांनी अचानक राजीनामा दिल्यामुळे यांच्या भूमिकेबाबत सर्वसामान्य कार्यकर्त्यां समोर प्रश्नचिन्ह आहे.
याबाबत त्यांना विचारले असता,आपण गेली अनेक वर्षे पक्षाचे काम केले.मात्र आता तब्येत साथ देत नसल्यामुळे आपण थांबण्याचा निर्णय घेतला आहे,असे ते म्हणाले.दरम्यान आता या ठिकाणी नवीन चेहऱ्यांना संधी मिळावी,असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला.

4