सुतार समाजाच्या विविध मागण्यांसाठी डी. के. सुतार यांचे २४ रोजी उपोषण

2

वैभववाडी/प्रतिनिधी तालुक्यातील सुतार समाजाच्या विविध मागण्यांसाठी शासन स्तरावर पूर्तता न झाल्यास मंगळवार दि. २४ डिसेंबर रोजी तहसिल कार्यालयासमोर उपोषणाला बसणार असल्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते डि. के. सुतार यांनी वैभववाडी तहसीलदार रामदास झळके यांना निवेदनाव्दारे दिला आहे.
वैभववाडी तालुक्यातील सुतार समाजाला उदरनिर्वाहसाठी पूर्वीची सुतार शाळा व्यवसाय बंद झाली आहे. वाढते यांत्रिकीकरण याचा फटका सुतार समाजाला बसला आहे. याबाबत अनेक वेळा शासन दरबारी सामाजिक कार्यकर्ते डी. के. सुतार यांनी लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांसमवेत समाजाच्या व्यथा मांडल्या आहेत. शासनाला जाग यावी यासाठीच उपोषण करणार असल्याचे त्यांनी निवेदनात म्हटले आहे.

4