Sunday, January 19, 2025
Google search engine
HomeUncategorizedअजूनही वेळ गेलेली नाही दीलीप नार्वेकरांनी माघार घ्यावी...

अजूनही वेळ गेलेली नाही दीलीप नार्वेकरांनी माघार घ्यावी…

विकास सावंत; जिल्हा परिषदसह पंचायत समिती सदस्यांना व्हीप बजावणार…

सावंतवाडी ता.२२: काँग्रेसशी बंडखोरी करून काँग्रेसच्या चिन्हावर निवडणूक लढवत असलेले उमेदवार दिलीप नार्वेकर हे पक्षाचे आजपर्यंत एकनिष्ठ कार्यकर्ते म्हणून गणले जात होते.त्यामुळे त्यांनी आपली उमेदवारी मागे घ्यावी,त्यांचा यथोचित सन्मान केला जाईल,त्यांच्यावर होणार्‍या कारवाया रोखल्या जातील,असे आवाहन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विकास सावंत यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केले.दरम्यान आगामी काळात जिल्हा परिषदसह सावंतवाडी पंचायत समिती सभापती व वेंगुर्ला पंचायत समिती उपसभापतीपद ताब्यात घेण्यासाठी काँग्रेसकडून प्रयत्न सुरू आहेत.त्यासाठी संबंधित सदस्यांना व्हीप बजावण्यात येणार आहे,असेही श्री.सावंत यांनी सांगितले.

यावेळी आमदार दीपक केसरकर,संजय पडते,नगराध्यक्ष पदाचे उमेदवार बाबू कुडतरकर,रूपेश राऊळ,अण्णा केसरकर,बाबल्या दुभाषी,पुंडलिक दळवी,बाबूराव धुरी,रविद्र म्हापसेकर,सिध्देश परब आदी उपस्थित होते

महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी आज येथे पत्रकार परिषद घेतली.यावेळी श्री सावंत म्हणाले,नार्वेकर यांनी आपण प्रदेशाध्यक्षांचे पत्र आणले असे सांगितले,मात्र ते पत्र बोगस आहे.थोरातांची सही स्कॅन करून ते लिहिले गेले आहे.त्यामुळे त्यांच्यावर कारवाई निश्चित होईल.ती सही आपली नाही,याबाबत खुद्द थोरात स्पष्टीकरण देणार आहेत.त्यामुळे निष्ठावंत असलेल्या नार्वेकरांनी माघार घ्यावी वेळ गेलेली नाही.आम्ही त्यांचा यथोचित सन्मान करुन ज्या कारवाया होतील त्या मागे घेण्याची जबाबदारी आमची आहे.मात्र त्यांनी तसे न केल्यास त्यांच्यासह त्यांच्या सोबत फीरणाऱ्या अन्य कार्यकर्त्यांवर सुद्धा कारवाईचा प्रस्ताव आपण वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवला आहे.
ते पुढे म्हणाले याठिकाणी सावंतवाडी नगरपालिकेची निवडणूक महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढली जात आहे राज्यात अशा प्रकारचे धोरण ठरलेले आहे त्यामुळे यापुढे जिल्हा परिषद अध्यक्षपदाची निवडणूक सावंतवाडी पंचायत समिती सभापती पदाची निवडणूक व वेंगुर्ले पंचायत समितीच्या उपसभापती पदाच्या निवडणुकीत काँग्रेसकडून संबंधित सदस्यांना बजावण्यात येणार आहे त्यासाठीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे त्यामुळे निश्चितच त्याचा फायदा महाविकास आघाडीला होणार आहे

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments