दीपक केसरकर:मी निष्क्रीय हे मान्य,मात्र हाॅटेल,पेट्रोल पंप उभे केले नाहीत…
सावंतवाडी ता.२२: येथील पालिकेची निवडणूक दीपक केसरकर विरुद्ध नारायण राणे अशी होत असली तरी संजू परब यांच्या रूपात या ठीकाणी राणेच दिसतात,त्यामुळे येथील जनता बाबू कुडतरकर यांना भरघोस मतांनी निश्चितच निवडून देईल,असा विश्वास माजी पालकमंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे व्यक्त केला.मी निष्क्रिय आहे ,हे मला मान्य आहे, कारण मी लोकांच्या जमिनी घेवून पेट्रोल पंप, हॉटेल आणि मल्टीप्लेस उभारले नाही.राजकारणाचा फायदा गरिबांच्या जमिनी राखण्यासाठी केला.त्यामुळे राणेंचे आरोप मला मान्य आहेत.साळगावकर यांनी माघार घ्यावी, त्याचे पुर्नवसन नक्कीच करू,असे ही श्री.केसरकर म्हणाले.
महाविकास आघाडीच्या पदाधिकार्यांची आज या ठिकाणी पत्रकार परिषद घेतली.यावेळी विकास सावंत,संजय पडते,नगराध्यक्ष पदाचे उमेदवार बाबू कुडतरकर,रूपेश राऊळ,अण्णा केसरकर,बाबल्या दुभाषी,पुंडलिक दळवी,बाबूराव धुरी,रविद्र म्हापसेकर,सिध्देश परब,अमेय तेंडोलकर,उदय भोसले आदी उपस्थित होते.
यावेळी केसरकर म्हणाले,याठिकाणी आणि सावंतवाडी शहराच्या विकासासाठी येथील लोकांनी मला गेली अनेक वर्षे निवडून दिले.माझ्यावर त्यांचा विश्वास आहे,परंतु आता या ठिकाणी होणाऱ्या निवडणुकीत नारायण राणे विरुद्ध दीपक केसरकर असा संघर्ष रंगवला गेला,ही वस्तुस्थिती आहे.त्याठिकाणी संजू परब यांना पाहिलं तर नारायण राणे दिसतात,त्यामुळे काही झाले तरी येथील जनता त्यांना स्वीकारणार नाही. नगराध्यक्षपदासाठी उभ्या असलेल्या श्री.परब यांनी यापूर्वी सावंतवाडीत टर्मिनस होऊ नये यासाठी प्रयत्न केला होता.त्यामुळे तब्बल पाच वर्षे प्रलंबित राहिले हे सावंतवाडीची जनता विसरली नाही.
निवडणुकीच्या आधी दोन महिने त्यांनी मडुरा या गावी असलेले नाव सावंतवाडीत घातले आणि आता ते निवडणूक लढवत आहेत.मात्र त्यांना येथील जनता स्वीकारणार नाही कणकवलीचा दहशतवाद याठिकाणी येता कामा नये अशी येथील नागरिकांची धारणा आहे.
केसरकर पुढे म्हणाले,या ठिकाणी मी निष्क्रिय आहे,असा राणे यांनी आरोप केला तो मला मान्य मात्र मी माझ्या मंत्री पदाचा उपयोग लोकांची बंद थिएटर्स खरेदी करण्यासाठी केला नाही ,लोकांच्या जमिनी घेतल्या नाहीत, त्या ठिकाणी पेट्रोल पंप हॉटेल व्यवसाय सुरू केला नाही ,त्यामुळे ते म्हणत असतील तर ते मला मान्य आहे. मला त्याबद्दल काही वाईट वाटत नाही.काही झाले तरी नारायण राणे यांच्या प्रवृत्तीला येथील जनता माफ करणार नाही.
सावंतवाडी शहर आपल्याकडे यावे यासाठी नारायण राणे यांचा गेले २३वर्षे हट्ट करीत आहेत, लहान मुलं चांदोबा मला पाहिजे असे सांगते तसे ते वीस वर्षे सावंतवाडी वर डोळा ठेवून आहेत.मात्र येथील जनता त्यांना सावंतवाडी देणार नाहीत असाही टोला केसरकर यांनी लगावला.नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी माघार घ्यावी त्यांचे पुनर्वसन आम्ही नक्कीच करू,महा गाडीचे उमेदवार बाबू कुडतरकर आहेत. त्यांच्या पाठीशी साळगावकर यांनी रहावे,त्यानी राजीनामा दिल्यामुळे ही निवडणूक लागली आहे.त्यामुळे त्यांनी सकारात्मक निर्णय घ्यावा,त्यांचे माझे कौटुंबिक संबंध आजही आहेत,आणि ते भविष्यात ते राहतील,असे केसरकर म्हणाले.
जिल्हा परिषद ताब्यात घेण्याचे स्वप्न नारायण राहण्याचे अपुरे राहणार आहेत,काही दिवसांपूर्वी सत्ता स्थापन करताना आपल्याकडे १४० आमदार आहेत,असा दावा करणारे नारायण राणे नंतर मात्र मागे पडले,ते त्यांचे गणित कच्चे आहे.असाही टोला यांनी श्री.केसरकर यांनी लगावला.