जमिनीच्या वादातून दोन गटात मारहाण,एक गंभीर…

406
2

आरवली-टांक येथील घटना;वेंगुर्ले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…

वेंगुर्ले : ता.२२ आरवली टाक येथील गोडकर कुटुंबीयांनमध्ये जमीन वादातून आज मारहाण झाली. यामध्ये एक जण गंभीर जखमी झाला असून त्याला अधिक उपचारा साठी गोवा बांबुळी येथे हलविण्यात आले आहे.
आरवली टाक येथे झालेल्या मारहाणीत लाडोबा महादेव गोडकर(७५) हे गंभीर जखमी झाले. आरवली टाक येथील रमाकांत महादेव गोडकर(७०)व ज्ञानेश्वर महादेव गोडकर(६५) यांनी लाख्या काठ्यांनी मारहाण केल्यामुळे श्री लाडोबा गोडकर यांना गंभीर दुखापत झाली. अशी तक्रार त्यांचे पुतणे गौरव गोडकर यांनी वेंगुर्ला पोलिसात दिली आहे. गोडकर हे गंभीर जखमी असल्यामुळे त्यांच्यावर गोवा बांबुळी येथे अधिक उपचार सुरू आहेत. त्यांना मारहाण करणारे रमाकांत व ज्ञानेश्वर गोडकर हेही जखमी झाल्याने त्यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. याबाबत वेंगुर्ला पोलिस ठाण्यात भा.द.वी. कलम ३०७, ५०४, ५०६ व ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक श्री.पाटील करीत आहेत.

4