Wednesday, December 4, 2024
Google search engine
HomeUncategorizedवेंगुर्ले-सागरेश्वर येथे बीच गेम्स महोत्सवाचे शानदार उद्घाटन

वेंगुर्ले-सागरेश्वर येथे बीच गेम्स महोत्सवाचे शानदार उद्घाटन

कबड्डी, हॉलीबॉल, रस्सीखेच बरोबरच पारंपारीक खेळाच्या होणार स्पर्धा

वेंगुर्ले : ता.२२ क्रीडा व युवक सेवा संचलनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग यांच्यावतीने आणि वेंगुर्ले न. प., उभादाडा ग्रामपंचायत यांच्या सहकार्याने फिट इंडिया मुव्हमेंट अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या बीच गेम्स महोत्सवाचे उद्घाटन खेळाडु, ग्रामस्थ, क्रीडा प्रशिक्षक, क्रीडा कार्यकर्ते यांच्या प्रचंढ जलोषात भव्य दिव्य मिरवणुकीने अप्पर जिल्हाधिकारी मंगेश जोशी यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी व्यासपिठावर प्राथमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर, निवासी उप जिल्हाधिकारी शुभांगी साठे, वेंगुर्ले तहसिलदार प्रविण लोकरे, उभादांडा सरपंच देवेंद्र डिचोलकर, मुख्याधिकारी वैभव साबळे, कबड्डी फेडरेशनचे दिनेश चव्हाण, क्रिडाशिक्षक  जयराम वायंगणकर, कबड्डी संघटनेचे तृषार साळगावकर, उभादाडा उप सरपंच गणपत केळुसकर, जिल्हा क्रीडा अधिकारी किरण बेारवडेकर, तालुका क्रीडा अधिकारी विजय शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मंगेश जोशी यांनी फिट इंडिया मुव्हमेंट ची गरज उपस्थितांना पटवून दिली व या शासकीय उपक्रमाचे महत्व स्पष्ट केले. किरण बेारवडेकर यांनी जिल्हयात विविध खेळामध्ये सहभागी झालेल्या खेळाडुचे स्वागत करुन त्यांना शुभेच्छा दिल्या. व तीन दिवस चालणाऱ्या या महोत्सवामध्ये कबड्डी, बीच हॉलीबॉल, बीच रस्सीखेच, बरोबरच पारंपारिक खेळ दोरी उडी, लगोरी, गोटी चमचा, टायर फिरविणे, इत्यादी खेळाचे महत्व सांगितले. व त्यानंतर सर्व उपस्थित अधिकारी, लोकप्रतिनिधी, नागरीक यानी सर्व पारंपारिक खेळाचा आस्वाद लुटला.
चौविस तारीख पर्यंत चालणा-या या महात्सवामध्ये कबड्डी, हॉलीबॉल, रस्सीखेच तसेच मैदानी स्पर्धा होणार आहेत. यामध्ये जास्तीत जास्त खेळाडुनी, नागरीकांनी सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन आंतरराष्ट्रीय शरिरसौष्ठवपटु किशोर सोनसुरकर यानी केले. आभार तालुका क्रीडा अधिकारी विजय शिदे यानी मानले. यावेळी शेकडो क्रीडाप्रेमी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments