राष्ट्रीय अपंग विकास महासंघाचे विविध पुरस्कार जाहीर…

2
  1. मालवण, ता. २२ : राष्ट्रीय अपंग विकास महासंघाचे जिल्हास्तरीय दिव्यांग उत्कृष्ट सामाजिक सेवा, क्रीडा, आदर्श संस्था, आदर्श व्यावसायिक पुरस्कार जाहीर झाले आहेत. सन २०१९ – २०२० चा जिल्हास्तरीय दिव्यांग यशस्वी व्यवसायिक पुरस्कार येथील सत्यम भगवान पाटील यांना जाहीर झाला आहे. तर क्रीडा क्षेत्रातील पुरस्कार संतोष दत्ताराम गांगनाईक यांना जाहीर झाला आहे. संस्थेचे जिल्हा कार्याध्यक्ष बाळासाहेब पाटील यांनी हे पुरस्कार जाहीर केले आहेत.

ऑ. कॅप्टन आबा पाटील फाउंडेशन पुरस्कृत आणि राष्ट्रीय अपंग विकास शाखा सिंधुदुर्ग यांच्यावतीने जागतिक अपंग सप्ताहाचे औचित्य साधून जिल्ह्यातील दिव्यांग क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या व दिव्यांग असूनही दिव्यांगांसाठी कार्य करणाऱ्या दिव्यांग व्यक्तीला पुरस्कार देण्यात येतात. या जिल्हास्तरीय पुरस्कारात मालवण मधून यशस्वी व्यावसायिक म्हणून सत्यम पाटील, क्रीडा प्रकारात आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ खेळाडू संतोष गांगनाईक यांना जाहीर झाला. तर सामाजिक कार्यकर्ता म्हणून सावंतवाडी येथील बाळासाहेब बोर्डेकर यांना, सामाजिक कार्यकर्ती म्हणून कुडाळच्या सौ. नीलिमा चव्हाण यांना, दिव्यांग मित्र म्हणून कट्टा पेंडूर येथील अनिल पाटील यांना जाहीर झाला आहे. आदर्श दिव्यांग विशेष शाळा पुरस्कार म्हणून कणकवली करंजे येथील छत्रपती शाहू महाराज गतिमंद निवासी शाळेस सन्मानित करण्यात आले. सन्मानचिन्ह, मानपत्र, शाल, श्रीफळ देऊन गौरविण्यात आले. पुरस्कार आपल्या दारी या उपक्रमाअंतर्गत पुरस्कार विजेत्यांना त्यांच्या घरी, संस्थेला भेट देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.

4