तारकर्ली ग्रामस्थांनी दिले व्हेल माशाला जीवनदान…

2

मालवण, ता. २२ : आज सायंकाळी तारकर्ली येथील राजाराम‌ उर्फ बाबु खराडे आणि लवु कुबल यांना मासेमारी करताना जाळ्यात आढळून आलेल्या व्हेल माशास जीवदान देण्यात आले.
मासेमारी करताना शेपुट जाळ्यात अडकल्याने या भल्यामोठ्या व्हेल माशाला किनाऱ्यावर आणण्यात आले. बाबु खराडे हे स्वत: सागर रक्षक म्हणुन कार्यरत असल्याने त्यांनी काळजीपुर्वक या माशाला किनाऱ्याला आणले. या घटनेची माहिती स्थानिक ग्रामस्थांना मिळताच त्यांनी या मच्छीमारांच्या बोटीच्या दिशेने धाव घेतली. यावेळी विष्णु कुबल यांनी या दुर्मिळ माशाला जीवनदान देण्याची कल्पना मांडली. त्यानंतर तेथे उपस्थित असलेल्या अनिल टिकम, दादा कांबळी, आबा देऊलकर, दिपक रामचंद्र कुबल, दादा खराडे, सहदेव चिंदरकर, लक्ष्मण मोंडकर व इतर ग्रामस्थांच्या मदतीने या व्हेल माशाला जाळ्यातून मोकळे करण्यात यश आले. त्यानंतर रश्मिन रोगे, हर्षद खराडे, भुषण धुरत या स्थानिक डाईव्ह मास्टर्सनी आपल्या स्कुबा कौशल्याचा मदतीने या व्हेल माशाला खोल समुद्रात नेवून सोडण्यासाठी मेहनत घेतली.

0

4